एफ-१५ विमानांच्या सुरक्षेत पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात   

जेद्दा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौर्‍यासाठी जेद्दा येथे  आगमन झाले. मोदी यांच्या रुपाने तब्बल चाळीस वर्षानंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान जेद्दाला आले आहेत. 
 
राजपुत्र मोहमद बिन सलमान यांच्या खास निमंत्रणावरून मोदी सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर आले आहेत. दोन्ही देशांत धोरणात्मक भागीदारी परिषद होत आहे. त्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जात आहे. २०१९ मध्ये मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. त्यानंतर संबंध वाढण्यास चालना मिळाली  दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचे विमान सौदी अरेबियाच्या हद्दीत दाखल होताच त्यांच्या सुरक्षेसाठी एफ १५ लढाऊ विमाने पाठवण्यात आली होती. अशा प्रकारची सुरक्षा एखाद्या परदेशी नेत्याला देणे महत्त्वाचे मानले जाते. 
 
त्या माध्यमातून दोन्ही देश संरक्षणात्मक सहकार्य वाढवीत असल्याचे द्योतक मानले जाते. पंतप्रधान मोदी यांनी राजपुत्र मोहमद बिन सलमान यांचा उल्लेख माझे बंधू असा केला. 
 

Related Articles